वेर्लेकर's मराठी आरती संग्रह

परंपरेचा ठेवा, आधुनिक रूपात

श्री गणपती आरती

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥

आरती शिव शंकर

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझुळां ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

आरती श्री देवी

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥

आरती श्री विठ्ठल

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा। वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुण्डलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा। चरणी वाहे भीमा उद्धरी जगा॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं। कांसे पीताम्बर कस्तुरि लल्लाटी।
देव सुरवर नित्य येती भेटी। गरुड हनुमन्त पुढे उभे राहती॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा। सुवर्णाची कमळे वनमाळा गळां।
राही रखुमाबाई राणीया सकळा। ओवाळिती राजा विठोबा सांवळा॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

ओवाळूं आरत्या कुर्वण्ड्या येती। चन्द्रभागेमाजी सोडुनियां देती।
दिंड्या पताका वैष्णव नाचती। पंढरीचा महिमा वर्णावा किती॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती। चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती।
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती। केशवासी नामदेव भावे ओंवाळिती॥

जय देव जय देव जय पाण्डुरंगा।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावें जिवलगा॥

येई हो विठ्ठले

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु० ॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई० ॥ १ ॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई० ॥ २ ॥

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।

विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो० ॥ ३ ॥

ज्ञानदेवाची आरती

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत | मनु वेधला माझा |
आरती ज्ञानराजा ||धृ०||

लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग |
नाम ठेविलें ज्ञानी || १ ||

कनकाचे ताट करीं | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबरही |
साम गायन करी || २ ||

प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्याचे केलें | रामा जनार्दनी |
पायीं मस्तक ठेविलें || ३ ||

श्री तुकारामाची आरती

आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा |
सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ ||

राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले |
तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले | आरती || १ ||

तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें |
म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें || आरती तुकारामा || २ ||

श्री कृष्ण आरती

ओवाळू आरती मदन गोपाळा |
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा || धृ ||

चरणकमल ज्याचे ती सुकुमार |
ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर || १ ||

नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान |
हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान || २ ||

मुखकमल पाहता सुखिचीया कोटी |
वेधले मानस हारपली दृष्टी || ३ ||

जडित मुगट ज्याच्या देदीप्यमान |
तेणें कोंदले अवघे त्रिभुवन || ४ ||

एका जनार्दनी देखियले रूप |
पाहता झाले अवघे तद्रुप || ५ ||

मंगल आरती

मंगल आरति प्रिया प्रीतम की मंगल प्रीति रीति दोउन की।
मंगल कांति हँसाने की दसनानन की मंगल मुरली वीना धुनि की॥

मंगल बनिक त्रिभंगी हरि की मंगल सेवा सब सहचरि की।
मंगल सिर चंद्रिका मुकुट की मंगल छबि नैननि में अटकी॥

मंगल छटा फबी अंग-अंग की मंगल गौर श्याम रस रंग की।
मंगल अति कटि पियरे पट की मंगल चितवनि नागर नट की॥

मंगल सोभा कमल नैन की मंगल माधुरी मृदुल बैन की।
मंगल बृंदाबन मग अटकी मंगल क्रीडन जमुना तट की॥

मंगल चरन अरun तरुवन की मंगल करनि भक्ति हरिजन की।
मंगल जुगल प्रिया भावन की मंगल श्री राधाजीवन की॥

दत्त आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैची कळेल ही मात ॥
पराही परतली तेथे कैचा हा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगे प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

हे भोळ्या शंकरा

हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..

गड्या मध्ये रुद्राक्षाचा माडा
लावितो भस्म कपाडा
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..

त्रिशूल डमरू हाती
संगे नाचे पार्वती
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..

भोलेनाथ आलो तुमच्या द्वारी
कोठे दिसे ना पुजारी
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..

हाता मध्ये घेउन झारी
नंदयावरी करितो सवारी
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..

माथ्यावर चंद्राची कोर
गल्या मध्ये सर्पाची हार
आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची
हे भोळ्या शंकरा ..

नमन / प्रार्थना

घालीन लोटांगन, बंदीन चरण,
डोळ्यांनी पाहिन रूप तुझें ।।
प्रेमें आलिंगिन, आनंदें पूजिन,
भावें ओवाळिन म्हणे नामा ।। १ ।

त्वमेव माता च पिता त्वमेव,
त्वमेव बंधुश्चसखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव,
त्वमेव सर्वं मम देवदेव ॥ २ ॥

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा
बुध्यात्मना वा प्रकृतीस्वभावात् ।
करोमी यद्यत्सकलं परस्मै,
नारायणायेतिसमर्पयामि ॥ ३।।

अच्युतं केशवंरामनारायणं,
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं,
जानकीनायकं रामचंद्र भजे ॥ ४ ॥

नामस्मरण

हरे राम हरे राम राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हर हरे (इति त्रिवार)

मंत्र पुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।।

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मस कामान् काम कामाय मह्यं। कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।
महाराजाय नम: ।

ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो
मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।

हरी ओम


ॐएकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् ।

ॐ तत्पुरुषाय विद्महे ।
महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॥

ॐ कात्यायनाय विद्महे।
कन्याकुमारि धीमहि
तन्नो दुर्गिः प्रचोदयात् ॥

नाना सुगंध पुष्पाणि यथाकालोद भवानी च |
पुष्पांजलिर्रमया दत्तो गृहाण परमेश्वरः ||